
करमाळा प्रतिनिधी
लिंबेवाडी सरपंच तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष किरण फुंदे यांची नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार सोहळा2024 साठी या वर्षीच्या आदर्श सरपंच या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी करमाळा तालुक्यामधून निवड झाल्याचे पत्र मिळाले आहे.

पत्रात असे लिहिले आहे की, “नालंदा ऑर्गनायजेशन महाराष्ट्र राज्य “संस्थेकडून सर्वेक्षणा दरम्यान नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार सोहळा 2024 साठी या वर्षीच्या आदर्श सरपंच या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी करमाळा तालुक्यामधून आपली निवड

झालेली आहे. आपल्या कार्यकाळामध्ये गाव सुधारण्यासाठी आपल्या योगदानातून होत असलेली कामे, सामाजिक बांधिलकी, शाश्वत विकास, या संदर्भात होत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. संस्थेच्या माध्यमातून

येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागात नवीन शाश्वत योजना राबविण्यात येणार आहेत. त्याकरिता आपले मार्गदर्शन संस्थेसाठी मोलाचे ठरेल हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. नालंदा ऑर्गनायजेशन कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

