
करमाळा प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त भारतभर ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्यावतीने डॉ. वंदना भाग्यवंत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनोगतातून वाचनाने व्यक्तिमत्व कसे प्रफुल्लित होते हे सांगितले आणि विद्यार्थ्यांनी आजच्या मोबाईलच्या काळामध्ये वाचन करणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील हे होते. त्यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून वाचनाची सुरुवात कशापासून करावी म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल हे पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. प्रमोद शेटे यांनी तर आभार बी.ए. भाग १ मधील विद्यार्थी विश्वंभर लांडगे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



