करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या मागणीस प्रतिसाद देत मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष निधीतून ग्रामपंचायत व पंचायतराज विभागातून करमाळा तालुक्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याने संपूर्ण तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये पूनवर, वांगी नं. ३, कोर्टी,रावगाव,

पिंपळवाडी,भोसे बिटरगाव,पांडे,कामोणे, साडे,खडकेवाडी,रामवाडी,टाकळी, मोरवड,वाशिंबे, शेटफळ, सोगाव(प) कव्हे या गावांसाठी सभामंडप रस्ता कॉंक्रिटीकरण, रस्ता मुरमीकरण, फेवर ब्लॉक, आधुनिक व्यायाम साहित्य, इत्यादी कामांसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील मागण्यासाठी रश्मी बागल त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचे

सदस्य दिग्विजय बागल यांनी वारंवार पाठपुरावा केला होता त्याला आज यश आल्याने या सर्व गावातील तसेच तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्री गिरीश महाजन यांनी अंदाज वर्तवल्याप्रमाणे या अखेरच्या मंत्रीमंडळ बैठकीत करमाळा तालुक्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने सर्वत्र रश्मी बागल व दिग्विजय

बागल यांचे कौतुक होत आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांच्या माध्यमातून याआधी देखील निधी मंजूर झालेला असून सदरील कामांचे भूमिपूजन देखील या दोन-तीन दिवसांमध्ये जोरदारपणे चालू असून रश्मी बागल व दिग्विजय बागल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यामधील विकासाची कामे करत आहेत अशी भावना बागल समर्थकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *