करमाळा प्रतिनिधी

सध्याच्या काळात पडद्याआड होणाऱ्या आणि नव्या पिढीला माहिती नसणाऱ्या आपल्या संस्कृती आणि अस्सल खुना असणारी लोकगीते, लोक नृत्य यांचे संवर्धन व्हावे तसेच नव्या पिढीवर संस्कार व्हावेत, तसेच आपला भारत देश हा वैविध्यतेसाठी ओळखला जात असल्याने आपल्याकडे सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे.

यानुसारनवरात्रीमध्ये महाराष्ट्रात भोंडला/हादगा/भुलाबाई आशा स्वरूपातील खेळ खेळण्याची परंपरा आहे. आश्विन पक्षात हस्त नक्षत्रापासून भोंडला सुरू होतो. एका ठिकाणी पाटावर मध्यभागी हत्तीची प्रतिमा काढून त्या भोवती लहान मुली पासून विवाहहिता पर्यंत सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपारिक गाणी म्हणत फेर धरतात, यालाच भोंडला असे म्हटले जाते. याच हेतूने

आज आपल्या न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये भोंडला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. भोंडला कार्यक्रमाची माहिती स्कूल मधील इंगोले मॅडम यांनी मुलांना सांगितली तर भोंडला विषयी गीत वाघमोडे मॅडम, ननवरे मॅडम यांनी सादर केले. या गितावर स्कूल मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी फेर धरला. नंतर नवदुर्गांचे आगमन करण्यात आले.

आपल्या स्कूल मधील इयत्ता 9 वी तील विद्यार्थिनीनी  नवदुर्गाची वेशभूषा धारण करून नवरात्री निमित्त नऊ ही दिवसांच्या देवीचे दर्शन घडवले. यानंतर सर्व मुलांनी- मुलींनी गाण्याच्या तालावर गरबा टिपऱ्या यांचा मनसोक्त आनंद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोकडे मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *