करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रिसिल फाऊंडेशन व य.च.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र या प्रकल्पासाठी क्षेत्र समन्वयक व डाटा एन्ट्री या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी एकूण १८

विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यावेळी प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील म्हणाले की, महाविद्यालयात नेहमीच संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न  महाविद्यालय करत

असते. या सर्व संधींचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी हनुमंत भालेराव, समुपदेशक आर्थिक साक्षरता, अविनाश शिंदे, केंद्र समन्वयक, प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे, आय.क्यू.ए.सी.

समन्वयक डॉ. अंकुश करपे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत परिवारातीलतील सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांचे आभार प्रा. सुधीर मुळीक यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *