करमाळा प्रतिनिधी

पुणे या ठिकाणी धनगर समाज सेवा संघ पुणे आयोजित सर्व शाखीय १७ वा राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधू-वर मेळावा रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रामकृष्ण मंगल कार्यालय, शिवदत्त नगर (नवी सांगवी)

पिंपळे गुरव पुणे ४११०६१ या ठिकाणी संपन्न होणार आहे असे धनगर समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी पत्रका द्वारे जाहीर केले आहे. धनगर समाजातील सर्व पोटशाखे मधील धनगर समाज बांधवांनी आपल्या

इच्छुक वधू-वरांची नावे १ डिसेंबर २०२४ पर्यंत ९६७३८३६८९८ या व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करावी. नावे नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आपल्या शिक्षित, उच्चशिक्षित मुला-मुलींना अनुरूप वधू-वर निवडीसाठी आपल्या वधू-वरांची नोंदणी करावी असे आवाहन धनगर समाज सेवा संघ पुणे शहर कार्यकारणी सदस्य संजय सरवदे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *