
करमाळा प्रतिनिधी
उमरड-विहाळ रस्त्याची बातमीची पेपर न्यूज दिल्यानंतर आता या रस्त्यावरून राजकारण चालू झालं आहे.
याच रस्त्याच्या दुर्दशा मुळे मी स्वतः काढत असलेला मराठी चित्रपट बंद पडला आहे. हे सगळ्या गावकर्यांना माहिती आहे. सगळ्या नेते मंडळी यांना माहिती आहे. चित्रपटाच उद्घाटन करण्यासाठी काही सत्ताधारी व विरोधी नेते मंडळी पण होते. पण मग रस्त्यावरून का राजकारण?

माझ मत आहे की, सत्ताधारी व विरोधी पक्ष नेते मंडळी यांनी यात राजकारण न आणता आता ह्या रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कुणाकडून का होईना पण आता लवकरात-लवकर रस्त्या तयार करावा. जेणेकरून या रस्त्यावरून ये-जा करणार्यांची गैरसोय होणार नाही आणि माझा चित्रपटाचे लवकर शूट चालू होईल.