जेऊर प्रतिनिधी

माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तीन युवानेते एकाच व्यासपीठावर, मोहिते पाटील बंधूसह रोहितदादा पवार यांची उपस्थिती असणार अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी दिली. येत्या शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस असून या

निमित्ताने जेऊर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबद्दल माहिती देताना देवानंद बागल यांनी सांगितले की, वास्तविक माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानी साजरा केला जातो. ही गेली तीस वर्षांपासून चालू असलेली रीत आहे. पण तरीही यंदाचा वाढदिवस हा आम्हा कार्यकर्त्यांसाठी खास असून यानंतर

सर्व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वस्व अर्पण करून व स्वतःला झोकून देऊन रनांगणात उतरावे लागणार आहे. आगामी निवडणुकीत नारायण (आबा) यांना विजयी करण्यासाठी युवकांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी राज्यातील तीन युवानेते एकाच व्यासपीठावर येत आहेत. नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील व राज्यातील एक अभ्यासू युवानेतृत्व म्हणून ओळख असलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा म्हणून आपल्या भाषणानी राज्यातील सभा गाजवणारे आमदार रोहितदादा पवार यांनीही दिनांक 23 ऑगस्ट रोजी आपण येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे हा दिवस युवकांसाठी प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे देवानंद बागल यांनी सांगितले. कार्यक्रमाची तयारी सुरु झाली असून मिनी मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबीर या सामाजिक तसेच क्रीडा उपक्रमांसाहा कर्मयोगी व्याख्यानमाला आयोजित केली गेली आहे. जेऊर येथील दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमास करमाळा माढा तालुक्यातील नागरिकांसह युवकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आव्हान देवानंद बागल यांनी केले. यावेळी सभापती अतुल पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, प्रा. अर्जुनराव सरक, प्रा. डॉ. संजय चौधरी, उपसरपंच नागेश झांजुर्णे, विनोद गरड, संदीप कोठारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *