करमाळा प्रतिनिधी

वाशिंबे रेल्वे स्थानकावर रविवार, मंगळवार, गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस चालणार्या पुणे (हडपसर) हैदराबाद एक्सप्रेस ला थांबा मंजूर करण्याची मागणी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, वाशिंबे रेल्वे स्थानकावरून सकाळी पुणे, दौंड येथे व संध्याकाळी जेऊर, कुर्डुवाडी, सोलापूर, बार्शी, ऊस्मानाबाद येथे वाशिंबे स्टेशन परिसरातील वाशिंबे सोगाव, ऊंदरगाव, गोयेगाव, मांजरगाव, राजूरी, रीटेवाडी, केतूर येथील नागरीकांना दवाखाना, कोर्ट कचेरीची कामे, शाळा, कॉलेज, खरेदी, चाकरमानी यांना जावे लागते. परंतू सध्या या वेळेत स्टेशन वर गाडीला थांबा नाही. त्यामुळे या परिसरातील नागरीकांना गैरसोईला सामोरे जावे लागते. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून आठवड्यातुन रविवार, मंगळवार व शुक्रवारी वाशिंबे येथून सकाळी 8 वाजता हडपसर येथे जाणारी गाडी क्रमांक 17014 हैदराबाद-हडपसर व सायंकाळी 4 वाजता हडपसर वरुन वाशिंबे स्थानकावर येणारी गाडी क्रमांक 17013 हडपसर हैदराबाद गाडीला वाशिंबे स्थानकावर थांबा मंजूर करुन प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे.

…………………

सदर गाडीस कुर्डवाडी ते दौंड दरम्यान ११० कि.मी. अंतर असून या अंतराकरीता रेल्वे ने १,५५ मी. ऐवढा कालावधी निर्धारित केलेला आहे. वाशिंबे येथे या गाडीस थांबा मंजूर केल्यानंतर देखील ही गाडी दौंड येथे निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार पोहोचते.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने धाराशिव (उस्मानाबाद) – बार्शी – कुर्डवाडी अंतराकरीता दिलेली रेल्वेची धाववेळ कमी करून “वाशिंबे” स्टेशनला हैदराबाद-पुणे (हडपसर) या एक्सप्रेसला सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रवासी थांबा मंजूर करून प्रवाश्यांची गैरसोय दूर करावी. यासाठी प्रवासी सेवा संघ अध्यक्ष संजय पाटील याच्यांशी संपर्क करुन पाठपुरावा करण्याची मागणी केली होती – सुयोग झोळ वाशिंबे ता. करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *