करमाळा प्रतिनिधी

करमाळा योग समितीच्या वतीने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग वर्गाच्या ठिकाणी प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी प्रोटोकॉल प्रमाणे योगा प्राणायाम आणि ध्यान घेण्यात आले. त्यानंतर योगदिंडी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून आणि अभिवादन करून योग दिंडीची सुरुवात करण्यात आली. सुरताल संगीत विद्यालय करमाळा,  आर्ट ऑफ लिविंग करमाळा आणि पतंजली योग समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ही योगदिंडी काढण्यात आली. भारत माता की जय, करे योग रहे निरोग, झाडे लावा झाडे जगवा अशा विविध प्रकारच्या देश

हिताच्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी समाजसेवक श्रेणिक खाटेर, डॉ. सुनिता दोशी, डॉ. कविता कांबळे, डॉ. महेश अभंग,  प्राचार्य नागेश माने, ललित आग्रवाल इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर योग दिंडीत सहभागी होते. यावेळी मोफत योग वर्ग चालवणारे योग शिक्षिका रेशमा जाधव, सुलभा पाटील,  योग शिक्षक प्राचार्य बाळासाहेब नरारे, अभयकुमार शहाणे, हनुमान सिंग परदेशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन संपत वीर गुरुजी, देशमाने गुरुजी, अशोक बरडे गुरुजी, तानाजी महामुनी, प्रवीण देवी, सुरेश चाळक, कैलास यादव, एडवोकेट सुनील जोशी, बाळासाहेब महाजन, शिवलिंग करळे, पत्रकार दिनेश मडके, प्रदीप नलवडे, डॉ. अनारसे, डॉ. जाधव, मंजुषा देवी, ज्योती मुथा, शिवकन्या नरारे इत्यादींनी केले. सूत्रसंचालन संतोष पोतदार तर निशांत खारगे यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *