करमाळा प्रतिनिधी
HBT आपला दवाखाना अग्निशामक केंद्र हॉल करमाळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. आर. राऊत व आर. डी. चमरे एम पी डब्ल्यू यांनी योग करण्याचे महत्त्व नागरिकांमध्ये पटवून देण्यात आले. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल जसे की मलेरिया, डेंगू यांची लक्षणे व उपाय सांगण्यात आले. यावेळी HBT आपला दवाखाना येथील स्टाफ नर्स तरवारे ए. बी. व सेक्युरिटी गार्ड कांबळे एस. के. तसेच परिसरातील नागरिक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.