करमाळा प्रतिनिधी

युनियन बँक करमाळा शाखेचे मॅनेजरची बदली व्हावे म्हणून तात्यासाहेब काळे यांनी झोनल ऑफिसर युनियन बँक करमाळा यांना अर्ज केला आहे.

त्या अर्जात असे सांगितले आहे कि, मी आपले बँकेच्या करमाळा शाखेचा खातेदार असून माझे नियमित दैनंदिन व्यवहार असतात, KYC करणे, फॉर्म भरून दिल्यानंतर दोन-दोन दिवस RTGS होत नाहीत. तसेच परंतु सदर शाखा मॅनेजर हे प्रत्येक

वेळी काही ना काही कारण सांगत असतात व काम करण्यास टाळाटाळ करतात व आमचीच समजूत काढून परत पाठवत आहे. तसेच सतत फोनवर तास-तास फोनवर बोलत असतात व त्यांचे फोनवरील बोलणे होईपर्यंत कॅबेनच्या बाहेर ताटकळत बसवत आहेत व बाहेरील मित्रकंपनीस बँकेत बोलावून घेवून कॅबीनमध्ये तासंतास गप्पा मारत बसत आहेत, याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. तरी आपणास विनंती की, माझ्या अर्जाची सहानिशा करून सदर मॅनेजरची तात्काळ बदली करावी व करमाळा शाखेतील नागरीकांना न्याय मिळावा असा अर्ज केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *