डॅा.प्रदिपकुमार जाधव-पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन आ संजयमामा शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॅा.प्रदिपकुमार जाधव-पाटील यांच्या निवासस्थानी सोलापुर आमदार संजयमामा शिंदे यांनी स्नेहभेट देऊन दुपारचे स्नेहभोजन केले.या भेटी दरम्यान आमदार संजयमामान सोबत पाटील कुंटुबियाची करमाळा तालुक्यांतील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसेच तरटगाव येथील बंधाऱ्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते.


यावेळी माजी जि.प.सदस्य उद्धवदादा माळी,आदिनाथचे माजी चेअरमन संतोष जाधव-पाटील,मांगी विकास सोसायटीचे चेअरमन सुजित बागल, राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार,तरटगावचे उपसरपंच अभिजीत पाटील, तात्यासाहेब पाटील, डॅा.रोहन पाटील, युवा नेते अंजिक्य (भैय्या) पाटील, स्वीयसहाय्यक प्रविण शिंदेआदिजण उपस्थित होते.
यावेळी तरटगाव आणि संगोबा येथील सीना नदीवर पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. मौजे तरटगांव, आळजापूर, बिटरगांव (श्री), पाडळी, बाळेवाडी, बोरगांव, पोटेगांव, खांबेवाडी, पोथरे, निलज, ढेकळेवाडी या गावातील सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्र याच बंधाऱ्याच्या पाण्यावरती अवलंबून आहे. पंरतु पाणी अडविण्यासाठी असणारी दारे खराब झालेली आहेत. बंधाऱ्यात पाणी अडवल्यानंतर याच बंधाऱ्याची गळती सारखी चालू असते. यामुळे पाण्याची पातळी कमी होते. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी कमी पडते. त्यामुळे पिकास पाणी देण्यास अडचणी निर्माण होतात.


या आधी सीना नदीवरील आष्टी तालुक्यातील सहा बंधारे आणि कर्जत, जामखेड तालुक्यातील कोल्हापूर पध्दतीतील चार बंधाऱ्यांना लातूरटाईप बॅरेज बंधाऱ्यामध्ये रुपांतर करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
तरी मौजे तरटगांव आणि संगोबा येथील सीना नदीवर असलेल्या बंधाऱ्याचे लातूरटाईप बॅरेज बंधाऱ्यामध्ये रुपांतर करण्यासाठी त्वरीत मंजुरी व निधी उपलब्ध करुन आ संजयमामा शिंदे यांनी द्यावा असे आदिनाथचे माजी चेअरमन संतोष पाटील यांच्या सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *