करमाळा प्रतिनिधी

या विद्यालयातील सहशिक्षक लोंढे सर आणि यू. एम. क्षीरसागर सर यांचा कार्यकाळ 31 मे 2024 रोजी संपला.

तसेच मार्च 2024 च्या बोर्ड परीक्षेत या विद्यालयाचा निकाल नेहमी प्रमाणे 100% किव्हा अगदी त्याच्या जवळ म्हणजे 98% इतका लागला. तसेच विद्यार्थी देखील चांगल्या गुणांनी पास उत्तीर्ण झाले.

तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत देखील विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

तेव्हा या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षक वर्गाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य समजून निंभोरे गावचे कर्तव्यदक्ष, युवा लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर यांनी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. त्यांना साथ देत याच गावचे सुपुत्र आणि पुणे येथे रहिवाशी असलेले रामेश्वर मारकड यांनी दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थिनींना प्रत्येकी 2500 रुपये असे प्रोत्साहन पर बक्षीस दिले.

        यावेळी कार्यकाळ पूर्ण झालेले शिक्षक लोंढे सर यांचा सन्मान करण्यात आला. नंतर दहावीत प्रथम क्रमांक वैभवी हरिभाऊ वळेकर (92%), द्वितीय क्रमांक विद्या कालिदास वाघमारे(91.80%) आणि नम्रता विठ्ठल वरकड(91.80%), तृतीय क्रमांक रोहिणी दत्तात्रय खडके(90.80%) या यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान हार, शाल, फेटा व रोख रक्कम 2500 रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थी मधुरा रामभाऊ वळेकर,शीवराज अर्जुन कन्हेरे, श्रद्धा रामा वाघमारे यांचा सन्मान रविदादा वळेकर यांचे शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष अरुण दादा वळेकर,देशमुख सर,विठ्ठल वरकड, महेश वाघमारे, हरिभाऊ वळेकर,नाना कन्हेरे,पत्रकार धर्मा दळवे,मुख्याध्यापक व्यवहारे सर, गोडगे सर,क्षीरसागर सर,बेरे सर,माळी सर, कांबळे सर, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *