
करमाळा प्रतिनिधी
12 मे हा फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेंस नाइटिंगेल यांनी आधुनिक नर्सिंग व्यवसायाचा पाया रचला आणि संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी समर्पित केले. या दिनाचे औचित्य साधून करमाळा येथे क्षितिज ग्रुप तर्फे प्रातिनिधिक स्वरूपात शमा बोधे सिस्टर आणि ढाकणे सिस्टर या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि फ्लोरेंस नाइटिंगेल ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पा फंड, माधुरी परदेशी, सुप्रिया येवले यांनी सर्वांचे स्वागत केले. मंजू देवी आणि नलिनी जाधव यांनी पाहुण्यांना शाल आणि भेट वस्तू देऊन सन्मान केला.

शमा बोधे यांनी सत्काराला उत्तर देताना क्षितिज ग्रुपच्या कार्याचा गौरव करून क्षितिज ग्रुपचे आभार मानले. ढाकणे सिस्टर यांनी त्यांचे अनुभव सांगितले तसेच फ्लोरेंस नाइटिंगेल यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करत रुग्ण सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
डॉ. सुनिता दोशी यांनी प्रास्तविक केले. स्वाती माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुजाता मेहता यांनी आभार मानले.