सोलापूर दि.13 (जिमाका) :- रविवार दिनांक 05 मे 2024 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 वाजेच्या दरम्यान नीरा उजवा कालवा कि.मी. 49/900 सेवा पथाकडील बाजूस मोठा घळ पडून माती मिश्रीत पाणी वाहू लागले होते. सदर ठिकाणी 1 मी. व्यासाचा व ज्याची खोली मोजता आली नाही असा खड्डा पडून पाईपींग सुरू झाले. कालव्याचा विसर्ग कमी करून घळ काढण्याचा प्रयत्र करण्यात आला परंतू गळती पुर्णतः बंद झाली नाही. या कारणामुळे निरा उजवा कालवा दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे अशी माहिती नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव 
       कालव्याचा विसर्ग पुर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता लक्षात घेता व त्याखाली असलेली 2000 लोकवस्ती बाधित होऊन मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होऊ शकते. यास्तव, कालवा विसर्ग बंद करून गळती पूर्णतः रोखण्याची कार्यवाही नीरा उजवा कालवा विभाग, फलटण या विभागामार्फत करण्यात येत आहे. असेही  कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी कळविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *