
करमाळा प्रतिनिधी
किरण ढमाले प्रोडक्शन प्रस्तुत यारी या बहुचर्चित चित्रपटाची रिलीज डेट ठरली असून येत्या 14 जून ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती चित्रपटाचे निर्माते किरण ढमाले यांनी अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर दिली

आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते सागरजी राक्षे व प्रकाश लांडे हे असून या चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन सागडे आहेत तर या

चित्रपटाचे छायांकन समीर सोनावणे यांनी केले आहे. दरम्यान या चित्रपटात आपल्याला अभिनेते सुनील गोडबोले, घनश्याम दरवडे,अपेक्षा चव्हाण, अरबाज शेख, पुष्पा चौधरी,तसेच पवन चौरे पाहायला मिळणार आहेत. दरम्यानया चित्रपटाचे संकलन

प्रितम तुगे यांनी केले असून या चित्रपटास खूप सुंदर संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. दरम्यान या चित्रपटाचे सह दिग्दर्शक आकाश कारभारी हे आहेत तसेच करण जरतोलिया व यश गुणवंत यांनी प्रोडक्शन ची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान पुणे परिसरात ह्या चित्रपटात चित्रीकरण झाल्यामुळे पुणे कर हा चित्रपट पहाण्यास उत्सूक आहेत.
