
करमाळा प्रतिनिधी
येथील “विप्र वनिता” ग्रुप तर्फे जागतिक महिला दिना निमित्त आयोजित “घे भरारी” स्टॉल्स ला भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमातील stalls चे उद्घाटन पंचायत समितीतील अभियंता पदावर कार्यरत असणाऱ्या माधुरी दीवाण मॅडम यांच्या हस्ते

झाले तर प्रतिमा पूजन ब्राह्मण महिला संघाचे अध्यक्ष निलिमा पुंडे, उपाध्यक्ष स्वाती मसलेकर, सचिव ज्योती कुलकर्णी, सहसचिव शुभांगी खळदकर, कोषाध्यक्ष आरती सूर्यपुजारी, संपर्क प्रमुख सारीका पुराणिक व प्रसिद्धी प्रमुख माधुरी भणगे

तसेच मंजिरी जोशी यांच्या वतीने झाले. प्रास्ताविक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्ष निलिमा पुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष स्वाती मसलेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या बहारदार शैलीत प्रज्ञा जोशी व कमल

कुलकर्णी यांनी केले. यावेळी संघातील ज्येष्ठ महिलांचे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. लहान मुलींनी श्लोक व नृत्य सादर केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पारंपारिक मंगळागौरी च्या नृत्य ठरले. या मध्ये मंजिरी जोशी, प्राची कुलकर्णी,

अमृता ठोंबरे, माधुरी भणगे, ज्योती कुलकर्णी, वंदना पाटील, शुभांगी खळदकर,पुजा मसलेकर यांनी सहभाग घेतला होता. या मधे लावलेल्या स्टॉल मधे तयार कपडे कुर्ती, हैद्राबादी साड्या, ज्वेलरी, पर्सेस, उन्हाळी पदार्थ, मसाले, चिवडे, चहा मसाला,

मुखवास, खाकरे, पाणीपुरी, भेळ, कॉटन कँडी, शेवया, चणा मसाला, थंड पन्हे इ. stalls ची भरपूर विक्री झाली. सर्व स्तरातील महिलांनी stalls ना भेट दिली व मनमुराद आनंद लुटला. stalls ना सर्व स्तरातील महिलांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण महिला संघातील सर्व कार्यकरिणी सदस्यांनी, महिलांनी, प्रशांत कुलकर्णी, अनंत मसलेकर व नाना रामनवमी वाले यांनी विशेष परिश्रम घेतले.