करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अमीर तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांनी भेट दिली. त्यावेळी अमीरशेठ यांना शाल, फेटा व श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी अभयसिंह जगताप हे बोलत होते,

धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर तुतारी स्वीकारली तर शरदचंद्र पवार गट हा अधिक मजबूत होईल. पुढे काय होईल काय सांगता येत नाही शरदचंद्र पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते कुणाला उमेदवारी देऊ शकतात हे सांगता येत नाही. मी माढा

लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पण पवार साहेब उमेदवार देतील त्या उमेदवारासोबत पक्षासाठी काम करेन असेही ते बोलत होते.

यावेळी पुणे काँग्रेसचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी, नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, राष्ट्रवादीचे ता. अध्यक्ष संतोष वारे आदी मान्यवर,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *