करमाळा प्रतिनिधी

प्रियंका गायकवाड यांचे आजपर्यंतचे पक्ष कार्य पाहून तसेच सर्वसामान्याला न्याय देणारे नेतृत्वगुण पाहून पक्षाने त्याना पुन्हा एकदा करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख पदी नियुक्ती केली असून मुंबई येथील अधिकृत कार्यालय बाळासाहेब भवन येथून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

मागील आठवड्यात त्रयस्थ महिलेची करमाळा तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. तशा आशयाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु पक्ष नेतृत्वाने पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या व प्रामाणिकपणे पक्ष बांधणी करणाऱ्या गायकवाड

याना न्याय देत तालुका प्रमुख पदावर पुनश्च नियुक्ती केलेली आहे. सदर नियुक्ती ही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना सचिव संजय मोरे, महिला सचिव तथा आमदार मनिषा कायंदे यांच्या हस्ते व तालुका संपर्क

प्रमुख रवि आमले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सदर नियुक्ती करण्याच्या अगोदर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्याशी वरिष्ठांनी चर्चा करीत निर्णय घेत नियुक्तीपत्र दिले.

गायकवाड यांच्या पुनश्च नियुक्तीने निष्ठावंत शिवसैनिकात आनंदाचे वातावरण असून सर्वसामान्य नागरिकांनी निवडीबद्दल समाधान व्यक्त करीत गायकवाड याना शुभेच्छा दिल्या.

यावेळी करमाळा उपतालुका प्रमुख सुभाष पाटील, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, आदि उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *