करमाळा प्रतिनिधी

माढा लोकसभेचे इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर सर्वप्रथम करमाळा शहरात सावंत परिवाराची त्यांनी आज सकाळी भेट घेतली असता त्यांनी सर्व मतदाराच्या भावना जाणून घेतल्या.

यावेळी सावंत गटाचे नेते सुनिल बापू सावंत म्हणाले की, महाविकास आघाडी जो उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघात देईल त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक फारूक जमादार, करमाळा विकास सोसायटीचे चेअरमन मनोज गोडसे, आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *