करमाळा प्रतिनिधी

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी उद्घाटन केले. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून असे कार्यक्रम घेतले जातात. यातूनच खूप मोठे कलाकार तयार होत असतात असे मनोगत अनिल बनसोडे यांनी व्यक्त केले. यांना

डॉ. कुंताताई नारायणराव जगदाळे जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम राऊत यांनी केले. गाण्यांचे सूत्रसंचालन जगताप मॅडम व जोशी मॅडम यांनी

केले. परीक्षक म्हणून बार्शी येथील उत्कृष्ट महिला शिक्षिका गोरे मॅडम, शिंदे मॅडम व प्रचंडराव मॅडम यांनी काम पाहिले. मोठ्या गटातील प्रथम भा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, द्वितीय नामसाधना प्राथ. विद्यामंदिर सेंटर स्कूल मुले नंबर-1,

तृतीय न.प.प्राथ.मुलींची शाळा क्र- 2. लहान गटातील प्रथम नामसाधना प्राथ. विद्यामंदिर सेंट्रल स्कूल मुले नंबर- 1, द्वितीय कै.साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींची शाळा क्र- 1, तृतीय न.प.प्राथ.मुला/मुलींची शाळा क्र- 4. सदर कार्यक्रम केंद्र

समन्वयक दयानंद चौधरी सर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण मंडळातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बलभीम शिंदे सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *