
करमाळा प्रतिनिधी
पारेवाडीचे नूतन उपसरपंच मधूकर गुंडगिरे या भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या हस्ते सत्कार व पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा. पारेवाडी गावच्या विकासासाठी व गावातील नागरिकांच्या सेवे साठी उपसरपंच मधूकर

गुंडगिरे यांना संधी. जगताप गटाचे कार्यकर्ते मधूकर गुंडगीरे यांची पारेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्या बद्दल तसेच गणेश मनोहर गुंडगिरे व रवींद्र रामहारी नवले यांचा यावेळी भाजपा जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप

यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजकारणात स्वच्छ चारित्र्य अन् समाजासाठी सदैव झटणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाकडून थेट निधी उपलब्ध होत असून अलिकडे ग्रामपंचायती चे अधिकार वाढले

आहेत. ग्रामसभेचा ठराव घेवून गावात विकासात्मक कामे करून गावाचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्यासाठी व एक आदर्श गाव बनवण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य अन् गावकऱ्यांनी एकजूटीने काम करावे. त्यासाठी आपण जगताप गटाचे

मार्गदर्शक मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनात सत्ता स्थानी असलेल्या भाजपा या राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन शंभूराजे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. या

सत्कार सोहळ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब लबडे, शिवाजी राखूंडे, रामदास गुंडगिरे, महादेव डुबल, क्रांतिसिंह पाटील, सरपंच पाडूरंग नवले, रामहारी नवले, अजीत सरवदे, मोहन पांढरे, दादासो पाटील, उमेश पाटील, रामदास चव्हाण, मनोहर गुंडगीरे, श्रीकांत नवले, गणेश गुंडगीरे, नामदेव गुंडगीरे, शशीकांत महामुनी, शिवलींग मोहीते, केशव खोटे, नवनाथ चव्हाण, महादेव चव्हाण, महादेव साखरे, लक्ष्मण खोटे, नानासो घाडगे, सुधाकर पाटील, विकास पाटील, सुहास मोहीते, गणेश चव्हाण, भाऊसो गुंडगिरे, बाळासो गुंडगिरे, जालींदर मोहिते, लक्ष्मण गुंडगिरे, शिवाजी डरंगे, सुनिल घाडगे, निलेश नवले, दत्तात्रय गुंडगिरे इ. सह गावातील प्रगतशिल बागायतदार, प्रतिष्ठित व्यक्ती, जेष्ठ नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.