करमाळा प्रतिनिधी

परिवर्तन प्रतिष्ठान व राजेश्वर हॉस्पिटल कोर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सनक्रिस्टल सोशल ॲण्ड एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गुरुवार दि. 14 मार्च 2024 रोजी आदर्श पालकत्व व मुलांच्या जडणघडणीत आई-वडिलांचा वाटा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कोर्टी येथील परिवर्तन प्रतिष्ठान हे नेहमी समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असते.

आधुनिक काळात हरवत चाललेली व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना जोपासली जावी किंबहुना अधिक वृध्दींगत व्हावी या उद्देशाने पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. संतोष सदाशिव मचाले यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी त्यांच्यामध्ये असणारा वेगळेपणा, अंगीभुत गुणवत्ता आणि वास्तविक क्षमता वैज्ञानिक रित्या ओळखुन मुलांना आदर्श विद्यार्थी बनवुन आपण आदर्श पालक कसे बनावे? याविषयी मचाले यांनी उपस्थित पालकांना संबोधित केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दुरंदे गुरुकुल प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला जाधव यांनी तर प्रास्ताविक डॉ. अमोल दुरंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. विद्या दुरंदे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *