करमाळा प्रतिनिधी

 केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी जी यांनी जातीने लक्ष घालून खूपप्रलंबित असलेला टेंभुर्णी ते जातेगाव या महामार्गाचे 45 मीटरचे राजपत्र प्रसिद्ध दिवसांपासून प्रलंबित असलेला टेंभुर्णी ते जातेगाव या महामार्गाचे 45 मीटरचे राजपत्र

प्रसिद्ध करून या महा मार्गातील सर्व अडथळे दूर करून करमाळा तालुक्याचे फार मोठे काम केलेले आहे. त्यासाठी करमाळ्याचे सुपुत्र केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे स्वीय सचिव प्रतीक नाथाजी शिंदे यांनी अथक प्रयत्न केले होते म्हणून प्रतीक शिंदे यांनी

काल गडकरी यांची समक्ष भेट घेऊन व त्यांना करमाळ्याच्या आई कमला भवानी मातेची भव्य अशी प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यावेळी गडकरी यांचे शासकीय स्वीय सहाय्यक दिपक शिंदे आणि

अमोल बिराजदार हेही उपस्थित होते. महामार्गा बाबत काही अडचण आल्यास आपण बिराजदार यांना सांगावे त्या सर्व अडचणी बिराजदार यांनी सोडवाव्यात असे निर्देश गडकरी यांनी बिराजदार यांना दिले. त्यामुळे टेंभुर्णी ते जातेगाव या

महामार्गाचे कामामध्ये आता कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करमाळा तालुकावासियांनी सर्वांनी बाळगावी असे आवाहन प्रतीक शिंदे व माझ्या तर्फे करण्यात येत आहे.

गुलाबराव बागल यांनी सांगितले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *