
जेआरडी माझा
सेवाग्राम (बापू कुटी) 5/3/2024
ईपीएस 95 पेंशनर व 28 करोड सदस्य यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप व सहकारी पक्षाला कामगार व कर्मचाऱ्यां नी आपली शक्ती दाखवून द्यावी. सेवाग्राम येथील सभेत एकमुखी निर्णय

ई पी एस 95 पेशंनराच्या निवृत कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समिति नई दिल्ली केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकी मध्ये सर्व राज्यांच्या पदाधिकार्यानी हात उंचावून आवाजी एक मताने घेतलेला निर्णय भाजपा ला 2024 मध्ये “मतदान” करायचे नाही.

दिनांक 5/3/2024 ला सेवाग्राम (बापूकूटी) यात्री निवास चे सभागृहा मध्ये निवृत कर्मचारी 1995 राष्ट्रीय समन्वय समिति नई दिल्ली संघटनेची केन्द्रीय पदाधिकार्यांची CWC मिटिंग पार पडली, मिटिंग मध्ये देशातील सर्व राज्याचे केंद्रीय

पदाधिकार्यानी सहभाग घेतला,गेली दहा वर्षा पासून देशातील 75 लाख इपीएस पेंशनरांना जगण्या इतपत मिनिमम पेंशन रूपये 9000/- व त्याला जोडून महागाई भत्ता मिळावा तसेच सुप्रीम कोर्टाचे 4/10/2016 चे निर्णयानुसार दिनांक 23/3/2017

चे भारत सरकार श्रम मंत्रालयाचे परिपत्रका प्रमाणे हायर पेंशन लागू करावी तसेच 4/11/2022 चे सुप्रीम कोर्टाचे निर्णया प्रमाणे दिनांक 1/9/2014 पूर्वी चे व नतंर चे पेंशनधारकांना विनाविलंब हायर पेंशन लागू करावी. ह्या करिता सन 2014

पासून दील्लीचे जंतर मंतर वर व रामलीला मैदानावर दरवर्षी भव्य आंदोलने करून सरकारला जागविण्यांचा प्रयत्न करण्यात आला. केंद्रीय श्रम मंत्री भूपेन्द्र यादव ह्यांचेशी अनेक दा चर्चा करण्यात आल्या. तसेच स्टॅडींग कमेटी सोबत चर्चा करण्यात

आली,दस्तावेज सादर केले, परंतु सरकार इपीएस पेंशन वाढी संमधी काही निर्णय घेत नाही, संसदे मध्ये सत्ताधारी पक्षाचे खासदार व विरोधी पक्षाचे खासदारानी EPS 95 पेंशन चा प्रश्न निकाली काढण्यां साठी अनेक खासदारानी आवाज उठविला ,पण सरकार निर्णय घेवून जेष्ठ पेंशनधारकांना न्याय देत नाही.
पंतप्रधान व केंद्रीय श्रम मंत्री भूपेन्द्र यादव,चीफ कमिश्नर ,लेबर सेक्रेटरी, ह्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी ह्या करिता सोलापूर येथील एक लाख घर वाटप समर्पण सोहळ्यात पतंप्रधानाचे जाहिर सभे मध्ये आयोजक माजी आमदार अॅडम मास्तरानी प्रस्तावनेतून इपीएस 95 चे जेष्ठ पेंशनधारकांना निवडनूकी पूर्वी पेंशन लागू करण्याची विनंती केली. परंतु पंतप्रधानानी त्यांचे भाषणात ह्या प्रश्नावर बोलन्याचे टाळले, निवृत कर्मचारी 95 राष्ट्रीय समन्वय समिति ने एका, एक निर्णय घेतला नाही, तर भूप्रेन्द्र यादव साहब केंद्रीय श्रम मंत्री ह्यांना संसदे मध्ये जावून दिनांक 8/8/2023 ला निवेदन दीले त्या निवेदना मध्ये निवडनूकी पूर्वी पेंशन लागू केली नाही तर भाजपा सरकार ला मतदान करणार नाही असे निवेदन देण्यात आले. तरी सरकारने कांही निर्णय घेतला नाही देशातील जेष्ठ पेंशनधारकांची संख्या पंच्याहत्तर लाख (75 लाख) आहे. त्यापैकी (36 लाख) पेंशनधारकांना रूपये 1000/- चे खालची पेंशन म्हणजे 700/- , 800/-, 900/- ते 1000/- पर्यंत मिळते, बाकी पेंशन धारकांना 1500/- , 2000/- 3000/-, ऐवढी पेंशन मिळते, सध्या चे महागाई मध्ये दोघे नवरा बायको जगू शकतात काय.