
करमाळा प्रतिनिधी
जनगणना, बीएलओ व निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य मानून करमाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक या कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीने नेहमीच योगदान देत आहे तसेच मागील महिन्यात देखील राज्य मागास वर्ग आयोगाच्या वतीने करण्यात आलेले

कुटुंब सर्वेक्षण देखील करमाळा तालुक्यातील पुरुष व महिला शिक्षक यांनी विहित वेळेत पुर्ण करून आपले कर्तव्य बजावले होते. खालील मागण्यांबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा.

निवडणुक कामातून दुर्धर आजार असलेले शिक्षक कर्मचारी (कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, किडनी प्रत्यारोपण, पॅरोलसिस, मेंदुच्या आजारासंबधी शस्त्रक्रिया) व दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना वगळणे, सहा महिन्यापेक्षा सेवानिवृत्त होणेस कमी

कालावधी राहिलेल्या शिक्षकांना लोकसभा निवडणुक कामातून वगळणे, तालुक्यातील सर्व आस्थापनेच्या पुरुष शिक्षकांना निवडणुक कामकाजासाठी नियुक्त केल्यास महिला शिक्षक यांना लोकसभा निवडणुक कामातून वगळणेस शक्य होईल असे

नियोजन करणेस विनंती आहे. तसेच निवडणुक स्टाफ कमी पडत असल्यास या तालुक्यातील महिला शिक्षक यांना करमाळा तालुक्यातच ज्या गावात त्या कार्यरत आहेत त्याच गावात किंवा त्या गावाशेजारील जवळच्या मतदान केंद्रात निवडणुक

कामी नियुक्ती करणेस विनंती आहे, बीएओ मानधन जमा झाले नाही याबाबत योग्य ती कार्यवाही होणेस विनंती आहे, राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने नुकतेच मराठा सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या निवेदनावर हनुमंत सरडे, चंद्रहास चोरमले, निशांत खारगे, प्रमोद काळे, शिवाजी खरात,रामहरी ढेरे, महेश निकत, चंद्रहास शिंदे, दादासाहेब सोरटे, भागवत गर्जे, सुनील पवार, जगताप, संतोष पोतदार, सुहास कांबळे, बाळासाहेब देशमाने, राजकुमार खडे यांच्या सह्या आहेत.
