आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर कार्यन्वित करावे – युवानेते शंभूराजे जगताप
करमाळा तालुक्यातील जिंती येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वडशिवणे , गुळसडी , उमरड , सावडी , पाडळी , पोफळज व राजूरी येथे नवीन उपकेंद्र मंजूर आहेत त्यापैकी मौजे वडशिवणे येथील उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचारी सुद्धा मंजूर आहेत परंतु अद्याप हे उपकेंद्र कार्यन्वित झाले नसून कर्मचारी सुद्धा नियुक्त केले नाहीत . सध्या पावसाळ्या चे दिवस आहेत . ढगाळ वातावरण व हवेतील गारठा यामुळे रोगट वातावरण निर्माण झाले आहे . नागरिकांमध्ये आजारीपडण्याचे प्रमाण वाढलेआहे .दवाखान्यांमध्ये पेशंटची गर्दी वाढलेली दिसत आहे . वडशिवणे गाव हे शहरापासून दूर आहे . त्यामुळे येथील आरोग्य उपकेंद्र महत्वाचे असून ते तात्काळ नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावे या करिता जगताप गटाचे युवा नेते तथा बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे .