कमलाई मिल्कच्या माध्यमातून दूध व्यवसायाला गत वैभव प्राप्त करून देऊ – डॉ विशाल केवारे
करमाळा प्रतिनिधी
कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट यांच्यावतीने करमाळा व परंडा तालुक्यातील दूध उत्पादक व दूध संस्थाचालक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना डॉ विशाल केवारे यांनी दूध व्यवसायातील बारकावे समजून सांगितले दुग्ध व्यवसाय कसा करावा त्यात सुधारणा कशी करावी हे मार्गदर्शन केले कमलाई मिल्कच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व पुढील पाच वर्षाचा आराखडा सादर केला त्यांनी सर्वांना दोन वेळेला स्वच्छ व ताजे दूध वेळेमध्ये संकलन करून संघामार्फत पोहचविण्याची जबाबदारी आहे हे आवाहन केले ज्या माध्यमातून आपण या दूध व्यवसायातील अडचणी दूर करून सर्व शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देऊ त्या वेळी आपण चांगले यशस्वी झालो आहे यावेळी दोन्ही तालुक्यातील व पंचक्रोशीतील शेकडो दूध उत्पादक शेतकरी संस्थाचालक उपस्थित होते सर्वांच्या वतीने डॉ विशाल केवारे यांचा सत्कार नागनाथ तकित यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने सांगता करण्यात आली होती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *