
तांबोळी ट्रस्टच्या वतीने रमजान ईद निमित्त शीरखुर्मा साहित्याचे वाटप..
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे व मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांच्या संकल्पनेतून हाजी हाशमुद्दीनशेठ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करमाळा शहरातील गोरगरीब गरजू बांधवांना रमजान ईद निमित्त शीरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. मुस्लिम समाज जातीच्या बांधवांना रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा या दृष्टिकोनातून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी तसेच हाजी उस्मानशेठ तांबोळी बंधू या दिवशी शीरखुर्मा साहित्याचे वाटप अर्थात किटस चे वाटप केले हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच करमाळा तालुका मुस्लिम समाजांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी सदरचा सामाजिक तसेच आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत असतो यावर्षी देखील उपक्रम राबविण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाचे युवा नेते उद्योगपती अमीरशेठ तांबोळी यांच्या सहित तौफिक शेख,असिम बेग,शाहरुख शेख, समीर शेख, नदीम शेख ,आरशान पठाण, अमन शेख, मतीन बागवान, आफताब पठाण, अमन शेख, अमीन बेग आदी बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा उपक्रम हा कमलादेवी औद्योगिक वसाहती मधील तांबोळी यांच्या कंपनी मध्ये आयोजित करण्यात आला होता

……
हिंदू व मुस्लिम बांधवांना गुढीपाडवा व ईद निमित्त शुभेच्छा – अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी
करमाळा प्रतिनिधी
गुढीपाडवा व रमजान ईद पाठोपाठ आली आहे या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा असे आवाहन करमाळा तालुका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे. रमजान ईद निमित्त सर्व बांधवांनी आठही मशीदत नमाजपठण करावे भारतात सर्वधर्म समभाव सलोखा जपावा यासाठी प्रयत्न करावे असे अध्यक्ष उस्मानशेठ तांबोळी यांनी सांगितले आहे.