
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील विकासकामांसाठी नागपुर हिवाळी अधिवेशनातुन बऱ्याच विकासकामांवर चर्चा होताना दिसत आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे हे सुद्धा नागपुरात तळ ठोकुन असुन, महायुती सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे त्यांनी अनेक विकासकामांचा पाठपुरावा केलेला असुन, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे सहकार्यातुन व संकल्पनेतुन लवकरच चांडगाव ता. इंदापुर ते पोमलवाडी ता. करमाळा या नविन ब्रिज चे काम मंजुरीचे प्रतिक्षेत आहे. याकरिता माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सततचा पाठपुरावा केलेला असुन या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण पुल लवकरच साकारणार असल्याचे ॲड. अजित विघ्ने यांनी सांगितले.

डिकसळ ते कोंढार चिंचोली पुलासही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे माध्यमातुन निधी प्राप्त झाला होता व त्याचे काम चालु आहे. सदरचे काम संथ गतीने होत असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर नाराजी व्यक्त होत असुन हे कामही वाढीव निधीसह लवकरच चालु करणेबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे हे प्रयत्नशील आहेत.
करमाळा तालुक्यातील महत्वपूर्ण रिटेवाडी उपसा सिंचन योजने बाबतचा आराखडा माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सादर केला असुन सदर आराखडा स्विकारला तरच ही योजना मार्गी लागणार आहे. कुकडीतील अतिरिक्त पाणी उजनीत आणुन ही योजना मार्गी लागु शकते व याबाबत अभ्यासपूर्ण माहिती माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पुर्वीच सादर केलेली आहे. करमाळा देवीचा माळ येथील कमलादेवी मंदिराला ५ कोटी निधी प्राप्त झालेला असुन त्यामुळे महायुती सरकारकडून करमाळ्याच्या विकासकामासाठी अग्रेसर राहुन विविध विकासकामे माजी आमदार संजयमामा शिंदे निश्चितपणे आणतील याबाबत खात्री राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केली आहे.