स्वयंअर्थ शाळांच्या अडचणींबाबतचे निवेदन आ.जयंत आसगावकर यांना देण्यात आले
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील स्वयंअर्थ शाळांच्या अडचणींबाबत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा याबाबतचे निवेदन शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांना करमाळा तालुक्यातील संघटनेने दिले आहे.
महाराष्ट्रातील स्वयंअर्थ शाळांच्या अडचणींबाबत महाराष्ट्रात स्वयंअर्थ तत्वावर 2005 पासुन अनेक शाळाना शासनानी मंजुरी दिली आहे. शाळा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत कायम विनाअनुदानित तत्वावर चालत आहेत. शाळांची व संस्था चालकांची अनेक प्रशनांबाबत अडचणी निर्माण झालेल्या आहेत. संघटनेने निवेदनात म्हटले आहे की,25% RTE मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी शैक्षणिक फी त्या त्या वर्षांत दिली जात नाही, त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पगार करणे अवघड होते. सदरची शैक्षणिक फी त्या त्या वर्षांत मिळणे कामी आपण प्रयत्न करावेत,स्वयंअर्थ शाळेतील शिक्षक वर्षानुवर्षे शिक्षक पदावर काम करीत आहेत तथापि त्यांची शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी केली जात नाही तरी सर्व शिक्षकांना मतदार नोंदणीत समावेश
करावा, राज्यसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांच्या खासदार आमदार फंडातून स्वयंअर्थ शाळांना अनुदानित शाळां प्रमाणे मदत देण्यात यावी, क्रीडा विभागाच्या अनुदानित शाळांना मिळणाऱ्या सवलती व मदत स्वयंअर्थ शाळांना मिळावी, अनुदानित शाळांना मिळणाऱ्या सोयी सवलती स्वयंअर्थ शाळांना मिळाव्यात आदी मागण्या बाबत निवेदन आमदार जयंत आजगावकर यांना देण्यात आले होते.यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश बिले, सचिव जयंत दळवी ,सदस्य नितीन भोगे, संदीपान गुटाळ, डॉ ब्रिजेश बारकुंड, तानाजीराव करचे, डॉ अमोल दुरंदे, सामाजिक कार्यकर्ते अश्पाक सय्यद, सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मुजावर,प्रा राजेश शिंदे, युवराज बिले आदी शिक्षक संघटनेचे संस्थापक कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते