
नरवीर शिवाजी काशिद स्थळाचे सुशोभिकरणाचे भुमिपूजन खासदार कोल्हेंच्या हस्ते
जेआरडी माझा
आज स्वामिनीष्ठ नरवीर शिवाजी काशिद समाधी स्थळासाठी आपल्या स्वनिधीतून दहा लाख रुपये निधी देणारे महाराष्ट्राचे एक राजकीय नेतृत्व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पन्हाळा येथील शिवाजी काशीद समाधीला भेट दिली.
त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कोल्हापूर, शिवा काशीद संवर्धन समिती यांच्या नियोजनातून त्यांच्या हस्ते पन्हाळा मुख्य रस्ता ते समाधिस्थळ या पायरी टप्प्याच्या बांधकाम जागेवरती भुमिपूजन केले.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले यांचे जतन व्हावे या भावनेतून काम करणारे खासदार म्हणून स्वतःला सिद्ध करणारे खा. डाॅ. अमोल कोल्हे साहेब.
महाराष्ट्रातील सर्वंच गडकोटांसाठी काम करण्याची भावना बोलून दाखवीताना, कोणत्याही गडावरील किल्ल्यावरील कामासाठी मागणी केलेला निधी देण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती मी पूर्ण करणारच, परंतु सदरच्या निधीची पूर्तता करून घेताना स्थानिक कार्यकर्त्यांना किती त्रास होतो याचीही जाणीव मला असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. बऱ्याच वेळेस निधी जाहीर होतो परंतु स्थानिक कार्यकर्ते ॲक्टीव्ह नसतील किंवा त्या कामाचा पाठपुरावा केला गेला नाही, तर बऱ्याच वेळा असा निधी कामाला लागत नाही, परंतु सयाजी झुंजार, मारुती टिपूगडे, बाबासाहेब काशीद यांनी सतत पाठपुरावा करुन,

कीमान तीन ते चार वेळा दिलेल्या पत्रामध्ये प्रशासनाला अपेक्षित असलेला बदल करुन घेवून मी जिथे आहे तिथे प्रत्यक्ष भेटून अति सचोटी ने हा निधी या समाधीस्थळा लावला. स्वामिनीष्ठ मावळ्याच्या स्मारकाला निधी लावता आला हे मी सद्भाग्य समजतो, बोलताना कोल्हापूर च्या नाभिक समाजाच्या सर्व टीमला धन्यवाद दिले.
गेली तीन-चार महिने पुणे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा नियोजन कोल्हापूर जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन या सगळ्या प्रवासातून हा निधी मंजूर करून घेताना झालेला त्रास खासदार साहेबांच्या शाबासकी मुळे फार आनंददायी वाटला.

आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आम्ही सर्वजण काम करतो. महामंडळाची स्थापना कोल्हापूर मध्ये झालेली आहे या गोष्टीचा नेहमीच आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या प्रेरणेतून आज पन्हाळगडावरती गेली 20 वर्षे स्वामिनीष्ठ शिवाजी काशीद समाधी स्थळाची सेवा करता आली याचा सार्थ अभिमान वाटतो. आजच्या खा.डाॅ. अमोल कोल्हे साहेब यांच्या आजच्या या भेटीसाठी, महाराष्ट्र शासनाचा रंगकर्मी पुरस्कार प्राप्त आदरणीय मेक अप आर्टीस्ट अमर झेंडे यांनी खास प्रयत्न केले. अमर यांचे मनापासून धन्यवाद सयाजी झुंजार कोल्हापूर यांनी मानले आहेत.