
करमाळा प्रतिनिधी
आरोग्य सेवा व अभियान संचालक आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या ०४/०३/२०२५ च्या मंजूर टिपणीने २०२१ पासून ची निधी अभावी प्रलंबित असलेली ग्रामीण रुग्णालय व आरोग्य उपकेंद्रासाठी निधी मंजूर झाला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ८ ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी ५० लाख व २० आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी प्रत्येकी ६१ लाख १९ हजार याप्रमाणे निधी मंजूर झाला असून यामध्ये करमाळा तालुक्यातील १ ग्रामीण रुग्णालय तर ४ आरोग्य उपकेंद्र बांधकामाचा समावेश आहे.



१५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ चा प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर झालेला आहे. या आराखड्यानुसार ग्रामीण रुग्णालय करमाळा ता. करमाळा येथे BPHU बांधकाम करणे – ५० लक्ष, प्रा.आ.उपकेंद्र करंजे ता. करमाळा बांधकाम करणे ६१.१९ लक्ष, प्रा. आ. उपकेंद्र निंभोरे ता. करमाळा बांधकाम करणे ६१.१९ लक्ष, प्रा.आ. उपकेंद्र फिसरे ता. करमाळा बांधकाम करणे – ६१.१९ लक्ष, प्रा.आ. उपकेंद्र मांगी ता. करमाळा बांधकाम करणे – ६१.१९ लक्ष असा २ कोटी ९४ लक्ष ७६ हजार निधी मंजूर झाला आहे. २०२१ पासूनच्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत होणार आहे.

…………………
सदरची बांधकामे जलद गतीने करण्यासाठी त्वरीत कार्यवाही सुरु करण्यात यावी. या कामांचे प्रशासकिय मान्यता, सविस्तर अंदाजपत्रके, तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया नवीन मंजूर कार्यप्रणाली प्रमाणे करण्यात यावी. कृपया हे तातडीचे समजावे – देवेंद्र पवार अधीक्षक अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई.