
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. माजी व्हा. चेअरमन रमेश कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी अर्ज स्विकारला आहे. यावेळी सह निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या. यावेळी कांबळे म्हणाले की, स्व. दिगंबरराव बागल

यांच्या सहकार्याने राजकीय सामाजिक काम करत आलो आहे. आज सातव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलो आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव आहे म्हणून सर्वाधिक मताधिक्याने मी निवडुन येत आहे. याही वेळी निवडणुकीत विजयी होणार व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी कारखाना चालू करणार आहे. आरपीआयचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सहकार्याने कारखान्याला निधी उपलब्ध करून देणार आहे. असेही अखेर आदिनाथचे मा. व्हा. चेअरमन रमेश कांबळे यांनी सांगितले आहे.
