ऊस बिलासाठी बहुजन संघर्ष सेनेने कुंभेज फाट्यावर केले चक्का जाम आंदोलन

करमाळा प्रतिनिधी

नोव्हेंबर महिन्यापासून थकित ऊसाची बिले मिळावीत म्हणून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी-करमाळा हायवे रोडवर चक्का जाम आंदोलन केले. या रस्ता रोको आंदोलना मुळे लांबलच लांब दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राजाभाऊ कदम आपल्या भाषणातुन म्हनाले मकाई, भैरवनाथ विहाळ, कमलाई पांडे, कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील घागरगाव, साई कृपा हिरडगाव व ईतर

कारखान्याने शेतकऱ्यांची बिले नोव्हेंबर महिन्यापासून थकवीली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर सबंधित साखर कारखान्याच्या चेअरमन वरती मनुष्यवधाचे गुन्हे शासनाने दाखल करावेत. बबन दादा विठ्ठलराव शिंदे साखरकारखाना माढा चे  पेमेंट वेळेवर करतात, दर ही चांगला देतात मग करमाळा तालुक्यातील कमलाई साखर कारखाना पांडे याचे ऊस बिल वेळेत का देत नाही? दोन्ही कारखाने तुमच्याच मालकीचे आहेत मग आमदार बबन दादा शिंदे दोन्ही कारखान्यात ऊस दर व बिल देण्यामध्ये

फरक का करता? करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सवती सारखी वागणूक का देता? मकाई साखर कारखान्याची नोव्हेंबर महिन्यापासून पासुन ऊस बिले व वाहतूक बिले थकली आहेत. शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली तरी दिग्विजय बागल झोपेतून जागे होईनात कृषी प्रदर्शनावरती तुम्ही कोट्यावधी रूपये खर्च केले मात्र शेतकऱ्यांची ऊसाची बिले दिली नाहीत, वाहतूक बिले दीली नाहीत, शेतकऱ्यांची तुम्हाला गरज नाहीका? भैरवनाथ साखर कारखान्याने ऊस बिले वाहतूक बिले थकवीली आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत नेहमी आपल्या भाषणात म्हणतात तिजोरीच्या चाव्या प्रा. शिवाजी सावंत कडे आहेत मग शेतकरी मेटाकुटीस आला तरी तरी ऊसाची बिले व वाहतूक बिले देत नाहीत मग तिजोरीच्या चाव्या हारवल्या

आहेत काय ? शंकरराव बाजीराव पाटील साखर कारखाना घागरगाव ईंदापुर या कारखान्याने नोव्हेंबर पासुन ऊस बिले वाहतूक बिले थकवीलेत या कारखान्याचे मालक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राज्यात व केंद्रात सत्ता आसनाऱ्या भाजपा पक्षाचे आहेत. मोदी साहेबांची भेट घेण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या करतात आणी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतात, गभ्रीत श्रीमंत आसताना शेतकऱ्यांची ऊस बिले वाहतूक बिले थकवतात, यांना शेतकऱ्यांची काळजी आहे काय? साईकृपा हिरडगाव कारखान्याने ऊस बिले वाहतूक बिले थकवीलेत या कारखान्याचे मालक माजी मंत्री बबनराव पाचपुते आहेत हे सुध्दा भाजपात आहेत यांचे सबंध मोदी शाहा बरोबर आहेत, गभ्रीत श्रीमंत आहेत तरी सुधा ऊसाची बिले वाहतूक बिले थकवीलेत, यांना शेतकऱ्यांची काळजी नाही काय? पुढे बोलताना राजाभाऊ कदम म्हणाले, या सर्व साखरसम्राटांना ईशारा देतो 30 एप्रील पर्यंत शेतकऱ्यांची ऊस बिले द्या जर 30 एप्रिल पर्यंत ऊस बिले दिली नाहीत तर सबंधित कारखान्यांच्या चेअरमन च्या बंगल्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आसा ईशारा दिला.

निवेदन  नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडल आधीकारी काजी मॅडम यांनी स्वीकारले. यावेळेस शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार बदे यांना चांगलेच धारेवर धरले. बदे यानी सांगितले, सर्व कारखान्यांच्या चेअरमन बरोबर तहसीलदार यांनी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच कारखान्यांच्या चेअरमन ची मिटींग बोलविली आहे. पोलीस आधीकारी एपीआय माहुरकर साहेबांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सभापती गहीनीनाथ ननवरे, सचिन काळे मराठा सेवा संघ, राजकुमार देशमुख राष्ट्रवादी, नंदकिशोर वलटे यांची भाषणे झाली.

दत्तू आबा गव्हाणे सरपंच पोफळज, भिमा घाडगे,सोमा घाडगे चेअरमन,कल्याण कोठावळे, विठ्ठल आप्पा शिंदे माजी संचालक आजीनाथ कारखाना, विष्णू रंदवे मा.सरपंच पोथरे, रवींद्र घोडके सरपंच आळजापूर, मच्छिंद्र गायकवाड, बिबीशन गव्हाणे उप सरपंच पोफळज, राजेंद्र पवार चेअरमन पोफळज , बलभीम गव्हाणे मा.उप सरपंच पोफळज, भाऊसाहेब हजारे, लहु भालेराव सरपंच कामोणे, आंगद लांडगे सरपंच पुनवर, श्रीरंग लांडगे,आवीनाश मोरे सरपंच खामगाव, संदीप मारकड पाटील सरपंच उमरड, निलेश पडवळे,समाधान बदे, ईरफान शेख,राहुल बदे,बालाजी मारकड, श्रीकांत मारकड, आप्पा भोसले, कालिदास कंबळे,म्हामुद शेख, दादासाहेब धेंडे, राहुल बदे, रामा पांडव, महादेव कडाळे, कालिदास लुचारे, हनुमंत खरात, राहुल खरात, सचीन चितारे, सुनील गरड,रूशी शिंदे,प्रवीण कांबळे, विकास कदम, लखन कदम,भीमराज कदम, लक्ष्मण कदम आदी शेकडोंच्या संख्येने शेतकरी ऊपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *