जेऊर प्रतिनिधी

आमदार नारायण आबा पाटील यांनी दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी मध्य रेल्वे, सोलापूर मंडल यांना एका लेखी पत्राद्वारे जेऊर रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक ०९६२७-०९६२८ सोलापूर अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळावा अशी मागणी केली होती. या मागणीचा मध्य रेल्वे सोलापूर मंडल यांचेकडून विचार होऊन एक सकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे

पाठवण्यात आला आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वे सोलापूर मंडलचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी आमदार नारायण आबा पाटील यांना एका लेखी पत्राद्वारे कळवली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मागणीनुसार जेऊर रेल्वे स्थानकावर अजमेर-सोलापुर-अजमेर या गाडीचा थांबा दिला जावा का याची सखोल पडताळणी केली. अहवालानुसार आपली मागणी व्यवहार्य असल्याने दिसुन आले असुन पुढील आवश्यक कार्यवाही साठी दि. ६ मार्च २०२५ रोजी

मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांना सदर अहवाल पाठवला असल्याने या पत्रातुन सांगितले आहे. यामुळे आता अजमेर-सोलापूर-अजमेर एक्स्प्रेसला जेऊर येथे थांबा मिळण्याच्या कामाला गती आली आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर निवडणुकीपुर्वी जनतेने अथवा नागरिकांनी मांडलेल्या एका एका मागणीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार दळण वळणाची सोय, सिंचन, वीज आणि आरोग्य आदि बाबत आमदार नारायण आबा पाटील दाखवत असलेल्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे. तर मध्य रेल्वे मुख्यालय मुंबई येथेही स्वतः आमदार नारायण आबा पाटील हे तेथील‌ वरीष्ठ अधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *