करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू आहे तो ताबडतोब थांबावा अशी मागणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव पाटील यांनी केली आहे.
शहर व तालुक्यात मटका, जुगार, वाळू, सट्टा, ऑनलाईन लॉटरी आदींचा धुमाकूळ चालू आहे.यामुळे युवक पिढी बिघडत आहे शहरात गल्ली बोळात मेन रोडवर पान टपऱ्या टाकून राजरोसपणे मटक्याचे आकडे घेत आहेत चुपचुपके वाळू मुरूम चालू आहे त्यांचे रेट ठरलेले आहे आँनलाईन सटया अनेक घटना घडल्या आहेत तरी हे धंदे लवकरात लवकर बंद करावे. याबाबत लवकरच सोलापूर जिल्हा अधिकारी व सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार आहे अशी माहिती छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव पाटील यांनी दिली आहे.