कूर्डुवाडी शहरात भारतीय जनता पार्टीकडे महिलांचा वाढता ओघ राष्टवादी युवती माढा तालुका अध्यक्ष शितल लोंढे यांचा भाजप पक्षात प्रवेश

कुर्डुवाडी प्रतिनिधी

भाजपा कुर्डुवाडी शहर माढा तालुका आढावा बैठक व जागतिक महिलादिनाचे निमित्त साधुन आज कूर्डूवाडी शहरातील भुषण हाॅल येथे महिलांची बैठक जिल्हा समन्यवक कोमलताई काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाअध्यक्षा धनश्रीताई खटके पाटील यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत पार पडली.
प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमातेच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
ऊपस्थीत मान्यवरांचा सत्कार कुर्डुवाडी शहर कार्यकारणीतील महिलांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरअध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे यांनी केले या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की कुर्डुवाडी शहर महिला आघाडीच्या वतीने शहरात महिलांचे संघटन करत असताना महिलांनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन त्यांच्या कला गुणाना वाव देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत,तसेच नागरीकांच्या विविध प्रश्नासंदर्भात आम्ही वेळोवेळी अंदोलने,निवेदने,पाठपुरवठा करुन आम्ही नागरीकांची कामे करण्यासाठी प्रयत्नशील असतो,तसेच येणार्या काळात महीलांचे संघटन मजबुत करुन कुर्डुवाडी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवु असे यावेळी सांगीतले.
प्रथम राष्टवादी युवती माढा तालुका अध्यक्षा सौ.शितल लोंढे यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला त्यांचे स्वागत या वेळी करण्यात आले.
या वेळी नुतन शहर कार्यकारणी मध्ये शहर कार्याध्यक्षा विद्या राजेंद्र गोसावी,शहर ऊपाध्यक्षा सौ.आरती सुधिर गाडेकर,सौ.साक्षी बालाजी गायकवाड,शहर सचिव सौ.अंजना संतोष कांबळे,शहर चिटणीस कु.वासंती चंद्रकांत गवळी यांच्या निवडी करण्यात आल्या.
या वेळी मंदाकीनी पाटील, युवती जिल्हा ऊपाध्यक्षा निलोफर शेख,माढा तालुका प्रभारी सविता कस्तुरे,शहर सरचिटणीस ऊपध्यक्षा सौ.स्वाती गोरे,शहर ऊपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई कारंजकर,मंजुश्री साठे,चिटणीस सौ.पदमावती दातार,ऊमेश भाऊ पाटील,पै.संतोष क्षिरसागर,सुधिर भाऊ गाडेकर,बालाजी गायकवाड,लक्ष्मण कांबळे,शार्दुल दातार,ऊपस्थीत होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *