करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केला असून आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार नारायण आबा पाटील यांना परत एकदा आमदार म्हणून विजयी करण्यासाठी संजय गुटाळ यांचेसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी निर्धार केला आहे. आज पांगरे नजीक लोकविकास डेअरी फार्म जवळील सांस्कृतिक सभागृहात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्वतः माजी आमदार नारायण आबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर व्यासपीठावर कंदरचे सरपंच भास्करराव भांगे, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, सभापती शेखर गाडे, चंद्रकांत पारेकर, भाऊसाहेब टेकाळे, बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब बोरकर व शहाजीराव राऊत, माजी पंचायत समितीचे सदस्य जयराम सोरटे, नरहरी दोन्ड, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, विनोद महाडिक, नितीन पारेकर, संतोष बापू पाटील, अमोल पाटील, पप्पू टेकाळे, संतोष गुटाळ, नागनाथ शेंडगे, अमोल पवार, गहिनीनाथ गुंजाळ, संतोष गणगे, तुषार पाटील, अनिल सातव, माजी उपसरपंच संतोष कोपनर, ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड सर, बाबासाहेब कोपनर आदिसाह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की संजय गुटाळ यांच्या प्रवेशाने तालुका विकासाला बळकटी मिळणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत युवकांच्या हाती सत्ता परिवर्तन करण्याची ताकद आहे. करमाळा मतदार संघातून युवकांचा आपणास फार मोठा पाठिंबा मिळत आहे. मला मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता हवी असून आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट असून यात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच नियोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर आपला पक्ष म्हणजेच नारायण आबा पाटील होय, आबासाहेब यांना आमदार केल्यानंतरच आपण सत्कार स्वीकारणार अथवा फेटा बांधणार असल्याचा निर्धार आदिनाथ कारखाना प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी बोलून दाखवला. तसेच कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या नावा शिवाय आदिनाथ कारखान्याचा इतिहास कधीच पूर्ण होत नाही. यामुळे आदिनाथ करगण्यास उर्जित अवस्था आणण्यासाठी नारायण आबा पाटील यांनी आता पुढाकार घ्यावा. आगामी विधानसभा निवडणुकीत मतपेटितून आपण आपले जबाबदारी पार पाडळी हे दाखवणार असून पांगरे परिसरातून नारायण आबा पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देणार असल्याचे संजय गुटाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पांगरे आणि परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *