
सोलापूर दि. 13 (जिमाका) :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे रविवार दि.16 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

रविवार दि.16 मार्च 2025 रोजी कोल्हापूर, कागल येथून मोटारीने दुपारी 02.00 वा. लिंबेवाडी ता. करमाळा येथे आगमन व कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.(गोकुळ) मार्फत ओपन ऍक्सेस स्कीम सौर प्रकल्प उद्घाटन सोहळयास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता लिंबेवाडी, करमाळा येथून मोटारीने मुंबई कडे प्रयाण करतील.
