
करमाळा प्रतिनिधी
होळी हा सण हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीच्या पूर्वसंध्येला, होलिकेच्या दहनाचे प्रतीक म्हणून शेकोटी पेटवली जाते.

होळीच्या अग्नीत धान्य, नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य टाकून तिला हार फुले वाहून होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात. होळीच्या दिवशी सर्व जण आपापसांतील मतभेद विसरून, एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात.

त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये या ही वर्षी होळी अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सजावट, रांगोळी काढून सुरुवात करण्यात आली. यानंतर गोवऱ्या, काट्या कुट्या सर्व एकत्र करून त्याची होळी विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे केली होती. यानंतर होलिकेलचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी होळीला नमस्कार करून तिला प्रदक्षिणा घातली. या नंतर स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना होळी विषयी मार्गदर्शन केले. होलिका दहन करून आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या सेलिब्रेशन साठी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी मेहनत घेतली.