
करमाळा प्रतिनिधी
कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांच्या त्यागाबद्दल अजित विघ्ने यांनी केलेल्या वक्तव्याचा बोलविता धनी माजी आमदार संजय शिंदे हे असून आगामी काळात त्यांना या कृतीची किंमत मोजावी लागेल, असा खणखणीत इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिला आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुची प्रक्रीया सुरु असुन माजी आमदार संजय शिंदे यांनी एक बैठक बोलविली होती व यात अजित विघ्ने यांनी कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांच्या बाबत एक चुकीचे विधान केले. यावर आज आमदार नारायण आबा पाटील गटाकडून भुमिका स्पष्ट करण्यात आली. यावर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, कर्मयोगी गोविंद बापु पाटील हे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी श्रध्दास्थान आहेत. त्यांच्या

त्यागाबद्दल अजित विघ्ने यांनी चुकीचे विधान केले. वास्तविक पाहता अजित विघ्ने हे एक प्यादे आहे. माजी आमदार संजय शिंदे यांना मुळात या तालूक्यातील कायदा शांतता व सुव्यवस्था बिघडवायची आहे. संजय शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला असुन त्यांच्या बरोबरच बबनदादा यांनाही आपल्या मुलाचा पराभव डोळ्यांदेखत पहावा लागला. माढा तालुक्यातील जनतेने शिंदे बंधूना नाकारले आहे हे मतदानातुन सिध्द झाले आहे. यामुळे आता माजी आमदार संजय शिंदे यांनी करमाळ्यात येऊन आपले उरले सुरले अस्तित्व टिकवण्यासाठी हि घाण पध्दत अवलंबली आहे. संजय शिंदे यांना केवळ करमाळा तालुक्यातीलच नव्हे तर माढा तालुक्यातील छत्तीस गावातील मतदारांनी नाकारले आहे. याचीच सल

शिंदे बंधुच्या मनात कुठे तरी सलत असुन त्यांनी आता आपल्या एका बाजरभुणग्या व चारित्र्य हिन कार्यकर्त्या करवी कर्मयोगी गोविंद बापु पाटील हे आज हयात नसताना त्यांचेवर चुकीचे वक्तव्य करायला लावले. माजी आमदार संजय शिंदे यांचा हा माज उतरवायला जनतेला वेळ लागणार नाही. यामुळे त्यांनी शिखंडी सारखे पडद्याआड राहुन कार्यकर्त्यां करवी असली वक्तव्ये करु नये. झाल्या प्रकाराची क्षमा मागून वेळीच चुकीची दुरुस्ती करावी अन्यथा पाटील गटाकडून पुढील पाऊल उचलले जाईल. माढा तालुक्यातील दादागिरी व गुंडगीरी जनतेने आता पुर्ण मोडीत काढली असुन आता संजयमामा शिंदे यांनी हि आकागीरी बंद करावी. शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावावर खोटी कर्ज काढलेली व पैसे हडप केलेली प्रकरणे अजून मिटली नाहीत. फसल्या गेलेल्या या शेतकऱ्यांमध्ये अनेक शेतकरी हे करमाळा तालुक्यातील आहेत याचे भान राखावे. अजित विघ्ने या व्यक्ती बद्दल पाटील गटाकडून काही प्रतिक्रिया द्यावी इतपत हा व्यक्ती लायकीचा नाही. परंतु चुकुन का होईना एका संविधानीक पदावर राहिलेल्या माजी आमदार संजय शिंदे यांनी मात्र त्यांच्या गटाचे नेतृत्व करत असताना डोके ठिकाणावर ठेऊन करावे. करमाळा तालुक्यातील जनतेच्या भावना दुखावतील अशा वक्तव्याचा स्वतः निषेध करावा अन्यथा त्यांच्या पाठबळामुळे त्यांच्या समोर केलेले हे वक्तव्य त्यांनाच अडचणीत आणणारे ठरेल असा इशारा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिला.
आदिनाथ सह. साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात सोमवार दिनांक-१० मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी तडाखेबाज भाषण केले होते. त्यामधे त्यांनी मागिल लोकांचा इतिहास आणि कार्य किती दिवस सांगत राहणार. विरोधक आता सांगतील कुणी चप्पल घातली नाही. आदिनाथसाठी कुणी काय काय केले. परंतु हेच नवीन पिढीला किती दिवस सांगणार. असा उल्लेख केलेला होता. परंतु या त्यांच्या वक्तव्यावरून ज्येष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी वार्ताहर परिषदेत टिप्पणी केली होती. तसेच पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी देखिल ॲड. अजित विघ्ने यांचे बोलवते धनी हे माजी आमदार संजयमामा शिंदे हे असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभुमीवर आज शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांचेशी संपर्क साधला असता. त्यांनी स्पष्ट केले की. ज्येष्ठ नेते गोविंदबापु पाटील यांनी केलेले कार्य मोठेच आहे आणि त्यांना आम्ही कायमच आदर स्थानी ठेवतो परंतु विरोधकांनी किती दिवस त्यांच्याच आदर्शावर मते मागायची, नविन पिढीने आपले कर्तुत्व देखिल सिद्ध केले पाहीजे. अशा आशयाने मी बोलत असताना मी भाषणात कोणाचेही नाव न घेता व कोणाविषयी काही टिका टिप्पणी न करता भाषण केले होते. परंतु माझे भाषण व्यवस्थित न ऐकताच यावर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची लायकी काढण्याइतपत वक्तव्ये केली जात आहेत. खरे तर माझ्या कडुन गोविंदबापु पाटीलच नाही तर कोणात्याच ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्याविषयी चुकीचे वक्तव्य कधी झाले नाही आणि होणारही नाही. आणि मी शिंदे गटाचा एक कार्यकर्ता असुन आमचे नेते संजयमामा शिंदे यांनी देखिल आजपर्यंत कोणावरही, कधीही खालच्या पातळीवर जाऊन टिका केलेली नाही. ते विकासकामांवरच बोलतात आणि मते मागतात. हे करमाळा तालुक्यातल्या नागरिकांना देखिल चांगले माहीत आहे. त्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते यांनी चुकीची वक्तव्ये करून दिशाभुल करण्याची पद्धत थांबवावी. त्यांनी इतिहास तपासावा मी युवक कार्यकर्ता म्हणुन वयाच्या आठराव्या वर्षी गोविंदबापू पाटील यांचे समवते व ॲड. शिवाजीराव मांगले व डांगे यांच्या नेतृत्वात आदिनाथ सहकारी बचाव पॅनलचा प्रचार केलेला कार्यकर्ता आहे. मात्र त्यावेळी गोविंदबापु पाटील आदिनाथ बचावचा नारा देत असताना कोण विरोधात पॅनल टाकुन लढत होते. हे पण पहावे. उगाच चुकीचा विपर्यास करून वक्तव्य करू नये. कारखान्याच्या अठ्ठावीस हजार सभासदांमधे परिवर्तनाचे वारे असुन आदिनाथ वाचविण्यासाठी संजयमामा शिंदे हेच सक्षम व खंबीर नेतृत्व आहे. अशी स्पष्टोक्ती ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.