करमाळा प्रतिनिधी

माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या जयंती दिनानिमित्त माजी आमदार संजय मामा शिंदे प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने भव्य शरीरसौष्ठव (बॉडी शो) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या पुतळ्यास माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. शिवराज जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कर्मवीर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जि.प. सदस्य चंद्रकांत सरडे, जि.प. सदस्य उद्धव माळी, सरपंच गौरव झांजुर्णे, न.पा. बांधकाम सभापती प्रवीण जाधव, सरपंच विनय ननवरे, नगरसेवक अतुल फंड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, सरपंच अजित विघ्ने, मनसे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप, शिवजयंती उत्सव समितीचे सचिन गायकवाड, सुरज इंदूरे, चेअरमन सुजित तात्या बागल, पत्रकार विवेक अण्णा येवले, अभिजीत लोंढे आदीं उपस्थित होते.

बॉडी शो स्पर्धेमध्ये एकूण साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम दहा जणांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अंतिम फेरीमध्ये बाशीद शिकलकर, अमन शेख या दोघांमध्ये चुरस होऊन कर्मवीर श्री चा किताब एस एस फिटनेस क्लब चा अमन शेख यांनी पटकावला. तृतीय क्रमांक लकी मोरे याने मिळवला. अभिजीत सदापुरे, उबेद शेख, जयदीप कुंभार, ओम मचाले, रोहित लोंढे, महेश कुंभार, रोहन परदेशी, पृथ्वीराज कोळेकर, कार्तिक साडेकर, रोहन मोरे, अक्षय जगताप, प्रजल पालवे, दिनकर कांबळे, सलमान सय्यद आदींना गौरविण्यात आले.

पंच म्हणून एस एस फिटनेस क्लबचे समीर सय्यद, पप्पू शिंदे, सारंग परदेशी, ओंकार परदेशी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान कोळेकर यांनी केले. करमाळा शहरातील पुतळ्यास सकाळी नगरसेवक प्रवीण जाधव, भाजपचे दीपक चव्हाण शशिकांत पवार, सचिन चव्हाण, किरण बोकन, शिवसेना शहरप्रमुख संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, समता परिषदेचे कार्याध्यक्ष मधुकर भुजबळ, नरेंद्रसिंह ठाकुर, माजी शहराध्यक्ष महेश परदेशी, नागेश राखुंडे, आनंद जगदाळे, आजाद शेख, अरुण काका टांगडे, युवराज चिवटे, अलीम शेख, आदित्य जगताप, ओम शेरे, जंगलनाथ ननवरे, प्रज्योत गांधी, बाळासाहेब पंडित, समीर शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष जमीर सय्यद, शेखर स्वामी, अभिजीत लोंढे, सावडीचे एकाङ आधी जण उपस्थित होते, यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या कार्याचा नाम उल्लेख केला,

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *