
करमाळा प्रतिनिधी
आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पंप हाऊस -2 कुंभेज येथील चौथ्या पंपाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. साध्य दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन चालू आहे. या आवर्तनामध्ये अगदी टेल मायनार पर्यंत घोटी, नेर्ले या भागापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी पोहचले असून या भागतील बंधारे, तलाव, नालबंदारे, नाला बिल्डिंग भरून घेतले गेलेले आहेत. सद्या कुंभेज येथील पंप हाऊस मधील चौथा पंप हा अनेक वर्षे झाले

नादुरुस्त होता. याची दुरुस्ती तातडीने करण्याची सूचना आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. यावर कुंभेज येथील पंप हाऊस दोन मध्ये युद्ध पातळीवर काम सुरु असून लवकरच हे काम पूर्ण होईल यामुळे येत्या काही दिवसात पंप हाऊस एक दहिगाव व पंप हाऊस दोन येथील सर्व पंप पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करतील. 2019 नंतर कधीही ही योजना दहा पंप सुरु करून चालवली गेली नव्हती. परंतु आमदार नारायण आबा पाटील यांनी कार्यतत्पर्ता दाखवत आता दहा मोटारीने पाणी उपसा

करून लाभ क्षेत्रातील सर्व भागात पाणी देण्याचे ठरवले आहे आणि याच उद्धेशाने या योजनेची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. पंपहाऊस दोन येथील काम चालू असल्यामुळे काही काळा पुरता पाणीपुरवठा स्थगित राहील याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी. परंतु साधारणता उद्या-परवा पासून दहिगाव येथील सहा व कुंभेज येथील चार हे सर्वच्या सर्व पंप पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करतील तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या रब्बी आवर्तनास तीस दिवसाची मंजुरी मिळाली असता नारायण आबा पाटील यांनी आम्हाला आणखीन मंजुरी वाढवून पंधरा दिवस आवर्तन देण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे व संबधित विभागाकडे केली असल्याने आवर्तन वाढवून मिळण्याची शक्यता आहे.माझ्या मतदारसंघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या राखीव असलेल्या 1.80 TMC पाण्याचा पूर्ण उपयोग लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी उचलून धरली असून यामुळे पाहिल्यांदाच दहिगाव उपास सिंचन योजनेच्या माध्यमातून वंचित राहिलेल्या अनेक भागामध्ये पाणी जाणार आहे.आणि रब्बी आवर्तनात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत असल्याने शेतातील ज्वारी,गहू,माका,हरभारा,ऊस,केळी ह्या पिकांना जीवदान मिळत असल्याने शेतकरी वर्गातून आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले जात आहे.
यावेळी उपअभियंता जलसंपदा विभाग राजगुरू साहेब व अभियंता आवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंप हाऊस एक व पंप हाऊस दोन मधील कर्मचारी तसेच सर्व यांत्रिक कामगार तसेच या खात्यातील सर्व कर्मचारी या आवर्तनासाठी अविरत पणे परिश्रम घेत आहेत.