अरणमध्ये ४ ऑगस्ट रोजी भक्त निवास व वास्तुशिल्प भूमिपूजन आणि भव्य मेळावा
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर हे संत शिरोमणी सावता महाराज यांचे गाव अकराव्या शतकापासून जगाला कर्मनिष्ठेचा संदेश देणारे हे वारकरी संप्रदायाचे प्रथम संत म्हणून परिचित आहेत शिवाय त्यांची संजीवनी समाधी देखील तेथे आहे, परंतु अश्या पवित्र तिर्थक्षेत्र स्थळी आजपर्यंत कुठलाही विकास झालेला नाही. महाराष्ट्रातील हे तीर्थक्षेत्र अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. तीर्थ क्षेत्र अरण विकासासाठी आणि विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी रविवार, ४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२:३० मिनीटाने सावता महाराज भक्त परिवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी भक्त निवास व वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृह व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार समीर भुजबळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार योगेश टिळेकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम शिंदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार प्रज्ञाताई सातव यांसह केशव महाराज उखळीकर, महामंडलेश्वर मनीषा नंद महाराज, रखमाजी महाराज नवले, भक्तीदासजी महाराज शिंदे उपस्थित राहणार आहेत. संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने भक्तनिवास बांधकामास अंदाजे ५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे, भक्तनिवास व सावता महाराजांच्या कार्यावर आधारित वास्तुशिल्प व इमारतीच्या भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. या मेळाव्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समता परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हा अध्यक्ष दिलीप भुजबळ यांनी सर्व ओबीसी बांधवांना आवाहन केले आहे.
यावेळी आबासाहेब खारे, दादासाहेब गोरे, सोमनाथ बोराटे,कुंडलीक देवकर,नाना देवकर,कालीदास ननावरे, राहुल शिंदे, आदीजण उपस्थित होते यांच्या सह संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व सावता महाराज भक्त परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *