करमाळा प्रशासकीय संकुलनातच खड्डेमय वातावरण…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा प्रशासकीय संकुलनातच खड्डेमय वातावरण झाले आहे खड्ड्यात पाणी का पाण्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अख्या करमाळा तालुक्याचा कारभार करणारे शासकीय संकुलन या ठिकाणी तहसील कार्यालय, करमाळा पोलिस स्टेशन,करमाळा पंचायत समिती, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग असे सर्व शासकीय कार्यालय याच परिसरात आहे अख्या तालुक्याचे रस्ते व विविध योजना मार्गी लावणारे येथील सर्व कार्यालय या ठिकाणी आहे तालुक्यातील नागरिकांचे रोज येणे जाणे आहे याच परिसरात प्रवेशद्वारातच खड्डे व पाण्याने ग्रामस्थांचे स्वागत होत आहे .आत मध्ये गेल्यानंतर चारी बाजूने चिखल व खड्ड्यातूनच ग्रामस्थांना जावे लागत आहे तरी या परिसरात उत्तम असे रस्ते व योग्य सेवा सुविधा तालुक्यातील ग्रामस्थांना मिळावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.