श्री संत गजानन महाराज दिंडी मधील वारकरी बांधवाची कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने मोफत दाढी कटींग सेवा
कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने श्री संत गजानन महाराज दिंडी शेगाव मधील वारकरी बांधवाची मोफत दाढी कटींग सेवा हा ऊपक्रम हा कार्यक्रम घेण्यात आला.
या ऊपक्रमाचा शुभारंभ संत सेवा मंडळाचे अध्यक्ष डाॅ.जयंत करंदीकर साहेब व अतुल बागल यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी डाॅक्टर असोशिएनचे अध्यक्ष हर्षद शहा,विश्वअर्पण संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार,चतुर्थी ऊपक्रमाचे अध्यक्ष बालाजी लुक्कड,शिवराज पाटील,लखन मासाळ ऊपस्थीत होते.
या वेळी बोलताना नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर म्हणाले की,दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा आदर्श ऊपक्रम कुर्डुवाडीतील नाभिक समाजाने केला आहे.श्री संत सेना महाराज हे वारकरी बांधवाची दाढी कटींग करत असताना तेथील राजाचे बोलावने संत सेना महाराजांना आले.पण वारकरी बांधवाची दाढी कटींग करत असल्यामुळे ते राजा पर्यंत जाऊ शकले नाही.त्यामुळे राजा चिडला.त्या राजाने संत सेना महाराजांना पकडुन आणण्याचे सैनिकांना सांगीतले.त्यावेळी साक्षात विठ्ठलाने श्री संत सेना महाराजाचे रुप घेऊन राजाची हजामत केली हा इतीहास आहे.
असे या वेळी सांगीतले.
या ऊपक्रमात ५२७ वारकरी बांधवानी मोफत
दाढी कटींग या सेवेचा लाभ घेतला.
या ऊपक्रमासाठी सुधिर भाऊ गाडेकर,बापु दळवी,रामदास राऊत,कुमार दळवी,महेश जाधव,पोपट गाडेकर,नितीन काळे,संतोष गाडेकर,वैजिनाथ,राऊत,औंकार जाधव,ईश्वर गाडेकर,नंदकिशोर वाघमारे,अजित गाडेकर,सोमनाथ राऊत,पांडुरंग राऊत,राजु सावंत,शिवतेज गाडेकर,संतोष दळवी यांचे सह नाभिक समाज बांधवांनी परीश्रम घेतले.
या ऊपक्रमा नंतर संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांचे कडुन या ऊपक्रमाबद्दल सर्व नाभिक समाजबांधवाचा सत्कार करण्यात आला.
या ऊपक्रमासाठी शमशु धारवाले टेंभुर्णी व गोल काडादीचाळ मिञ मंडळाचे सहकार्य लाभले.