पश्चिम भागातील शेतकर्यांसाठी
दिग्विजय बागल यांचा पुढाकार.
वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी 132 के,व्ही,सबस्टेशन उभारणीसाठी मकाईची जमीन उपलब्ध करुन देणार…
पश्चिम भागातील शेतकर्यांसाठी
दिग्विजय बागल यांचा पुढाकार.
प्रतिनिधी करमाळा
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी या भागात 132 के,व्ही सबस्टेशन उभारणी करणे गरजेचे असून यासाठी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्काची जमीन देण्यात येईल अशी ग्वाही मकाई कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांनी कावळवाडी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट शेजाळ होते करमाळा तालुक्यातील कावळवाडी येथील रश्मी बागल व दिग्विजय बागल यांच्यावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांनी “कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.मोरवड, केम,वांगी नं ३,वीट,वडगाव (उ) केतुर नं २ वरकटने,येथील मेळाव्यांनंतर हा आठवा मेळावा होता.यावेळी बागल यांनी बोलताना सांगितले की उजनी धरणात पुरेसा पाणी साठा असतानाही कात्रज, कावळवाडी,जिंती, रामवाडी , भिलारवाडी या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी उन्हाळ्यात पिके जगविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यामुळे या परिसरात उन्हाळ्यात पुरेसा पाणी साठा राहील अशा पातळीवर बुडीत बंधारा झाल्यास येथील शेतकऱ्यांना फायदेशीर होणार आहे.याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी ही केली आहे.पुढील आठवड्यात पाटबंधारे विभागाकडून स्थळ पाहणी करून शासनास अहवाल सादर केला जाणार आहे असे बागल यांनी बोलताना सांगितले.
यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, ज्येष्ठ नेते व संचालक बाळासाहेब पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप सभापती चिंतामणी जगताप, मकाई चे संचालक रामभाऊ हाके,सतीश नीळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ काकडे,आजिनाथ खाटमोडे, अजित झांझुर्ने,विलास काटे,दत्ता गायकवाड,रेवणनाथ निकत, गणेश झोळ ,दत्तात्रय कनीचे,रामदास कनीचे,दिवेगव्हाण चे सरपंच हनुमंत पाटील,स्वप्नील गोडगे,रणजित शिंदे, पप्पू गुळवे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला या मेळाव्यास मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
चौकट.
हायमास्ट दिवे,स्ट्रीट लाईट,बस स्थानक शेड, बाकडी,पेव्हर ब्लाँक,समाज मंदीर तसेच शासनाकडून नियमित मिळणारा शासकीय कार्यालये व शाळा वर्ग खोल्या साठीचा निधी अशी कामे झाली कि विकास झाला अशी विकासाची व्याख्या येथील मागील दहा वर्षांतील लोकप्रतिनिधींनी करुन ठेवली आहे.
औद्योगिक वसाहत,सिंचनाचे प्रश्न,मजबूत रस्ते,लोकसंख्या वाढल्याने त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती,क्रिडा संकुल,शासकीय जलतरण तलाव,तालुक्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या जास्त असल्यामुळे नवीन पोलीस ठाणे,कुर्डुवाडी येथे राज्य राखीव दल बल गटाचे प्रशिक्षण केंद्र,जेऊर स्टेशन येथे माल धक्का,केम येथे ग्रामीण रुग्णालय,पारेवाडी येथे महावितरणचा नवीन उपविभाग,डीकसळ परिसरात बुडीत बंधारा,उजनी जलाशयात पूल,रीटेवाडी उपसा सिंचन योजना,केम वडशिवने उपसा सिंचन योजना,पांढरेवाडी उपसा सिंचन योजना पूर्व भागातील सिना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप होणे अशी कामे होणे आवश्यक आहेत.याप्रश्ना संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे वेळ मागीतली असून अधिवेशन संपताच करमाळा तालुक्यातील प्रश्नासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.