राजेश्वर हॉस्पिटलच्या वतीने कोर्टी येथे सवलतीच्या दरात मूळव्याध उपचार शिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी: तालुक्यातील कोर्टी येथील राजेश्वर हॉस्पिटल आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूळव्याध तज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश्वर हॉस्पिटल कोर्टी येथे रविवार दि.०७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ ते दु ३ या वेळेत सवलतीच्या दरात मूळव्याध उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे सुपुत्र श्री बालाजी मंजुळे (सचिव ग्रामविकास व पंचायतराज विभाग, आंध्रप्रदेश) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कोर्टी येथील राजेश्वर हॉस्पिटल हे तब्बल दहा वर्षापासून सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून प्रत्येकवर्षी मोफत आरोग्य शिबीराचे नियोजन करत असते. चालू वर्षी मार्च महिन्यात राजेश्वर हॉस्पिटलच्या डॉ. अमोल दुरंदे यांनी आरोग्य विषयक सुपर स्पेशलिटी शिबीर यशस्वी करून दाखवले त्यानंतर चालू वर्षात हे दुसरे आरोग्य शिबिर हॉस्पिटलने यशस्वी करून दाखवल्याने आणि नागरिकांना सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध होत असल्याने हॉस्पिटलकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मूळव्याध सारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढत आहे. करमाळा तालुक्यातील परिसर हा ग्रामीण असल्याने या आजाराच्या बाबतीत नागरिकांमध्ये जागृती नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे गेल्या काही दिवसात सातत्याने जाणवले आहे. अश्या शिबिरातून नागरिकांना नक्कीच मोठा फायदा होत आहे.

याशिबिराला डॉ.सकट व डॉ.समुद्र याँनी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी करमाळा तालुक्यातील विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली आरोग्य सुविधा देण्याचा संस्थेचा मानस असून, कालच्या शिबिरात सर्व ग्रामस्थ, बंधू भगिनींनी दिलेला प्रतिसादाने आमच्या प्रयत्नाचे चीज झाल्याची भावना मनाला सुखावून गेली. असे शिबिराचे मुख्य संयोजक डॉ. अमोल दुरंदे व डॉ. विद्या दुरंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

चौकट

“आयएएस बालाजी मंजुळे साहेब यांनी घेतले शिबिरात उपचार.”

“गावोगावी राबवण्यात येत असलेली शिबिरे ही नक्कीच समाज उपयोगी असून, याचा सामान्य नागरिकांना मोठा फायदा होत असतो. काल कोर्टी येथील शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गेलो असता मी स्वतः देखील या शिबिरात मूळव्याध आजारावर उपचार केले. लोकसहभागातून अशी शिबिरे यशस्वी होतात. सातत्याने अशी शिबिरे आयोजित करून यशस्वी करण्यात राजेश्वर हॉस्पिटलने नावलौकीक कमावला आहे.”

बालाजी मंजुळे
(सचिव,ग्रामविकास व पंचायतराज विभाग, आंध्रप्रदेश)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *